महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट…

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. यामुळे याची जोरदार चर्चा सध्या सुरू झाली आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी फोटो शेअर केले आहेत.
ही भेट नेमकी कशासाठी होती, याबाबत अजून सविस्तर माहिती समोर आली नाही. सुप्रिया सुळे म्हणाल्या, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांची आज भेट घेतली. यावेळी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त महाराष्ट्राच्या कुशल विणकरांनी बनवलेली खास पैठणी त्यांना भेट दिली.
भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. असेही त्या म्हणाल्या. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद सुरू असताना ही भेट मगत्वाची मानली जात आहे. सध्या दिल्लीत अधिवेशन सुरू आहे. विरोधक सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीका करत आहेत.
यातच उद्धव ठाकरे देखील दिल्लीत असून त्यांनी शरद पवार यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यामुळे सुप्रिया सुळे नेमकं कशासाठी पंतप्रधान मोदींना भेटल्या, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनी अजून भेटीचे कारण सांगितले नाही. मात्र वेळ दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.