मोठी बातमी! ‘वाल्मीक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर’, निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा


बीड : गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. अशातच आता बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची मला ऑफर होती, असा दावा त्यांनी केला आहे. सध्या सोशल माध्यमांवर रणजीत कासले यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.

बोगस एन्काऊंटर साठी पाच कोटी, दहा कोटी आणि 50 कोटींची ऑफर दिली जाते, असं देखील रणजीत कासले यांनी केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. यामुळे वाल्मीक कराड याच्या एनकाउंटर बद्दल केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली. रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते. मागील काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं.

या ऑफर वर मी म्हणालो, हे पाप माझ्याकडून होणार नाही. 10 कोटी, 20 कोटी, 50 कोटी, अशी वनटाईन ऑफर दिली जाते. तो पोलीस अधिकारी कुठेही असेल तरी त्याला हव्या विभागाला बोलावून घेतले जाते, असं रणजीत कासले यांनी म्हटलं आहे. मी सायबर विभागात होतो. त्यांना माहिती होतं, हा माणूस करु शकतो. यामुळे मला ही ऑफर देण्यात आली होती.

मी माझा मोठेपणा सांगत नाही, नाहीतर सोडलेले कुत्रे माझ्या अंगावर भुंकतील, असा आरोप करत बोगस एन्काऊंटर कसे होतात? यावर देखील रणजीत कासले यांनी वक्तव्य केलं. सगळ्यांना 5 कोटी, 10 कोटी रुपयांची लम्पसम ऑफर दिली जाते. एक अधिकारी, दोन अंमलदार, हवालदार, अशी टीम असते. असेही ते म्हणाले.

पोलसांना सांगितले जाते की, याची चौकशी झाली तरी आमचं सरकार आहे, आम्ही चौकशीतून तुम्हाला मुक्त करु, असे . अक्षय शिंदे प्रकरणात पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करा, एसआयटी बसवा, सगळं सत्य समोर येईल, असंही रणजीत कासले यांनी म्हटलं आहे. या विडिओमुळे सध्या मोठी खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!