पुण्यात कुंडेश्वर दर्शनाला जाणाऱ्या पिकअपचा अपघात! सात भाविकांचा मृत्यू, २० जखमी..

पुणे : श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारनिमित्ताने शिव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यात भीमाशंकर हे मोठे ज्योतिर्लिंग असल्याने येथेही भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करत आहेत. त्यासोबतच, अनेक शिव मंदिराकडे वाहनांच्या व भाविकांच्या रांगा दिसून येतात.
दरम्यान, भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कुंडेश्वर दर्शनाला जाताना भीषण अपघात झाला असून या दुर्दैवी घटनेत ७ महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर, १५ ते २० महिला भाविक जखमी झाल्या आहेत. साधारणत: दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारासचा हा अपघात घडल्याची माहिती आहे.
पापळवाडी येथील काही महिला दर्शनासाठी कुंडेश्वर येथे जात होत्या. या ठिकाणी जाताना घाटातून प्रवास करावा लागतो. या घाटातच त्यांची गाडी दरीत कोसळली.
त्यामुळे या अपघातात ८ महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य २० पेक्षा जास्त महिला या जखमी असल्याचं बोललं जात आहे. अपघातानंतर जखमींना तातडीने पाईट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तिथे उपचार सुरू आहेत.