मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, कधी लागणार निकाल? जाणून घ्या…


नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज (दि.१४) सुनावणीस सर्वोच्च न्यायलयाने नकार दिला. या प्रकरणी आम्ही ऑगस्ट महिन्यातील तारीख देतो, असे सुप्रीम कोर्टाने सांगितलं. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी पुढील महिन्यापर्यंत लांबणीवर गेली आहे. याकडे आज संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

गेल्या वर्षी राज्यात मोठं राजकारण झालं. उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि आमदार एकनाथ शिंदे यांनी यावर दावा केला. यामुळे याबाबत कोर्टात सुनावणी सुरू आहे. याबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदेंना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं जावू नये यासाठी ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

आता ठाकरे गटाने शिंदे गटाला निवडणूक आयोगाने दिलेले धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावं, अशी मागणी केली. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ‘शिवसेना’ हे नाव, निवडणूक चिन्ह म्हणून ‘धनुष्यबाण’ आणि वाघासह पुन्हा भगवा ध्वज वापरण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना देताना निवडणुक आयोगाने न्यायालयप्रविष्ठ असे लिहिण्याचे निर्देश दिले होते. त्या धर्तीवर शिवसेना चिन्हाबाबत देखील निर्णय घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. यामुळे येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे अडचणीत येऊ शकतात.

दरम्यान, ठाकरे गटाच्या वतीने बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांनी मात्र सुनावणी लवकरात लवकर घेण्याची मागणी केली होती. आमचा आग्रह होता की, या प्रकरणावर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच सुनावणी व्हावी. जेणेकरून यावरील निर्णय लवकर लागेल.

असे असताना मात्र, न्यायालयाने सर्व बाजूंचा विचार करून ऑगस्ट महिन्याची तारीख निश्चित केली आहे, अशी माहिती सरोदे यांनी दिली. या प्रकरणी आम्ही सुनावणी घेण्यास तयार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाने आता या मुख्य प्रकरणावर ऑगस्ट महिन्यात सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!