‘मोठी बातमी! ‘या ‘लाडक्या बहिणींना सरकारचा दणका ; 8 हजार महिलांकडून 15 कोटी रुपयांची वसुली होणार?

पुणे : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने मोठ्या दणक्यात सुरू केली होती. या योजनेतील बोगसगिरी थांबवण्यासाठी नुकताच लाडक्या बहिणींना ईकेवायसी पूर्ण करण्याचा आदेश धडकला आहे. तर त्यात पतीचे आधार कार्ड जोडणेही बंधनकारक केले. अशातच आता लाडक्या बहिणीनां सरकारने मोठा दणका दिला आहे. राज्यातील 8 हजार लाडक्या बहिणींकडून आतापर्यंत त्यांच्या खात्यात जितके हप्ते जमा झाले. ते सर्व परत घेतले जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचा टेन्शन वाढल आहे.

लाडकी बहीण योजनेत अनेक सरकारी महिलांनी फायदा घेतला. अशा सरकारी महिला कर्मचाऱ्यांची संख्या 8,000 च्या घरात असल्याचे समोर आले. ही गंभीर फसवणूक असल्याने अशा महिला कर्मचाऱ्यांकडून वित्त विभागाने हप्ता वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. या कर्मचाऱ्यांकडून एकूण 15 कोटी रुपयांची वसूली करण्यात येणार आहे. तर महिला कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.या योजनेत लाभार्थी महिलेच्या खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा करण्यात येतात. तर या योजनेचा लाभ घेणाऱ्या 8 हजार महिला कर्मचाऱ्यांकडून 15 कोटींची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. तर आता ईकेवायसी निकष पूर्ण न करणाऱ्यांनाही मोठा फटका बसणार आहे.
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरसकट लागू करण्यात आली. तर 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये करण्याचे आश्वासनही राज्य सरकारने दिले होते. पण या योजनेनंतर निकषांची लाट आली. तर काही भाऊरायांनी सुद्धा योजनेचा लाभ घेतल्याचे तपासणीत समोर आले. त्यानंतर कसून छाननी करण्यात आली.आत्ता निकष लागू करण्यात आले आहे.
