मोठी बातमी! विजयानंतर मनोज जरांगेना सरकारचा झटका ; पोलिसांची मोठी कारवाई..


मुंबई : मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारत मुंबईत मोठे आंदोलन केले. सलग पाच दिवस चाललेल्या या आंदोलनाला अखेर यश मिळाल्यानंतर सरकारकडून जीआर काढण्यात आला. या विजयानंतर आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे यामुळे मनोज जरांगे पाटलांना मोठा झटका बसला आहे.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्यापुढे सरकारने शरणागती पत्कारत काल सरकारकडून एक जीआर काढण्यात आला. यात राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद गॅझेटचा जीआर हाती पडताच मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली. आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आलेल्या आंदोलकांवर आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.मुंबईत आलेल्या आंदोलकांवर मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मुंबईतील आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, डोंगरीसह मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात बेकायदेशीर जमाव जमवणे, रस्ता अडवणे आणि दमदाटी करणे यांसारख्या आरोपांखाली हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अज्ञात आंदोलकांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान या आंदोलनादरम्यान मुंबई शहरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील झोन १ च्या हद्दीतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये आझाद मैदान पोलीस ठाण्यात ३, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात २ तर जे. जे. मार्ग, कुलाबा, एम.आर.ए. मार्ग आणि डोंगरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांमध्ये बेकायदेशीर जमाव जमवणे, दमदाटी करणे यांसारखे आरोप ठेवण्यात आले आहेत.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!