मोठी बातमी! तुळजाभवानी मंदिरातून देवीची तलवार गहाळ, खजिना खोलीतून तलवार गायब…

तुळजापूर : येथील तुळजापूरमधील तुळजाभवानी (Tuljabhavani) मंदिरातून देवीची तलवार गहाळ झाल्याचा गंभीर आरोप पुजाऱ्यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून याबाबत आता तपास करण्याची मागणी केली जात आहे. ही तलवार खजाना खोलीत नसून मंदिराबाहेर नेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
यामुळे तपास करून याबाबत काही गडबड आढळली तर कारवाईची मागणी केली जात आहे. याबाबत मंत्रोपचार आणि होम हवन करून देवीच्या आठ आयुधांमधील शक्ती तलवारीमध्ये काढून ती गायब करण्यात आली. पद्मश्री गणेश द्रविड शास्त्री यांनी ही पूजा केल्याचा आरोपही पुजाऱ्यांनी केला आहे.
याबाबत मंदिर प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप होत आहे. गहाळ झालेली तलवार तात्काळ मंदिरात परत आणण्याची मागणी पुजारी करत आहेत. यावर मंदिर प्रशासनाने माहिती घेऊन प्रतिक्रिया देऊ, असे म्हटले आहे. यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे तपासात सत्य बाहेर येणार का हे लवकरच समजेल.
देवीची पवित्र तलवार मंदिराच्या खजाना खोलीत असावी, मंदिरात असावी किंवा मंदिराच्या परिसरामध्ये असावी. परंतु मंदिराच्या बाहेर जर नेली असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे आणि याबाबत जे कोणी जबाबदार प्रशासनाचे अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे पुजाऱ्यांचे म्हणणे आहे.
यामुळे आता ही तलवार घावणार की नाही हे लवकरच समजेल, मात्र यावरून शंका उपस्थित केली जात आहे. याबाबत रीतसर तपास करण्याची मागणी केली जात आहे. येणाऱ्या काळात याबाबत अधिकची माहिती समोर येईल.