मोठी बातमी! माजी आमदार रवींद्र धंगेकरांना कोर्टानेच लावला’ ब्रेक ‘; ,’या ‘प्रकरणात न बोलण्याचे आदेश..


पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना भाजप नेत्यावर आरोपांची राळ उडवून देणारे शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या निकटवर्तीय असलेल्या व्यावसायिक समीर पाटील यांनी धंगेकर यांच्याविरुद्ध कोर्टात क्रिमिनल केस आणि दिवाणी दावा दाखल केला असून याबाबत कोर्टाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.या संदर्भातील सुनावणीमध्ये रवींद्र धंगेकर यांना पुणे सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. हा खटला चालू असेपर्यंत समीर पाटलांविरुद्ध कोणतेही वक्तव्य नका अशा सूचना दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे पुणे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर सडकून टीका करण्याची मालिकाच सुरू केली आहे.सुरुवातीला गुंड निलेश घायवळ याच्याशी संबंध असल्याप्रकरणी त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातील व्यक्ती असणाऱ्या समीर पाटील यांच्यावर निशाणा साधत समीर पाटील मार्फत निलेश घायवळ हा चंद्रकांत पाटलांसोबत संपर्कात असल्याची टीका केली होती. त्यानंतर जैन बोर्डिंग जमिनीच्या गैरव्यवहाराप्रकरणी रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र आता सुसाट सुटलेल्या धंगेकरांना एका प्रकरणामध्ये न्यायालयानेच ब्रेक लावला आहे.

दरम्यान चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय आणि पुण्यातील व्यावसायिक समीर पाटील आणि गुंड निलेश घायवळ यांचे संबंध असल्याचा दावा रवींद्र धंगेकर यांनी केला होता. समीर पाटील यांच्यामार्फत निलेश घायवळ हा चंद्रकांत पाटील यांच्या संपर्कात असल्याचंही रवींद्र धंगेकर म्हणाले होते. या आरोपांनंतर समीर पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात 14 ऑक्टोबर रोजी अब्रुनुकसानीची 50 कोटी रुपयांची नोटीस पाठवली होती. त्यानंतर समीर पाटील यांनी पुणे जिल्हा न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला आणि दिवाणी खटलाही दाखल केला आहे. या दाव्याची सुनावणी 27 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. या संदर्भातील सुनावणीमध्ये रवींद्र धंगेकर यांना पुणे सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. हा खटला चालू असेपर्यंत समीर पाटलांविरुद्ध कोणतेही वक्तव्य नका अशा सूचना दिल्या आहेत. याबाबत समीर पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!