मोठी बातमी! माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे पुणे विमानतळावरून अपहरण, पोलिसांकडून तपास सुरू…

पुणे : पुणे विमानतळावरून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. पुणे विमानतळावरून तो बेपत्ता झाल्याची माहिती आहे. याबाबत तपास सुरू आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नऱ्हे परिसरातून सायंकाळी 5 वाजता स्विफ्ट गाडीतून त्यांचे अपहरण झाले, अशी माहिती आहे. पोलिसांनी याबाबत पथके तयार केली आहे. याबाबत पोलीस सीसीटीव्ही तपासणी करत आहेत.
पुण्यातील गर्दीच्या ठिकाणाहून राज्याच्या माजी आरोग्यमंत्र्यांच्या मुलाचं अपहरण होणं ही बाब धक्कादायक आहे. सिंहगड पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. यामुळे सावंत कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, स्वीफ्ट गाडीतून चार लोक उतरले आणि त्यांनी तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही तपास सुरू केला आहे.