मोठी बातमी! माजी गृहमंत्र्यांचे हल्ल्यावरून गंभीर आरोप, फॉरेन्सिक रिपोर्टबद्दल केला मोठा दावा

पुणे : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर काही दिवसापूर्वी हल्ला करण्यात आला. या हल्याला आत्ता राजकीय वळण देण्यात आले आहे. मात्र, आता देशमुखांनी फॉरेन्सिक रिपोर्टबद्दल मोठा दावा केला आहे.ही घटना झाल्यापासून सुरूवातीपासून याला राजकीय रंग देण्यात आला. मी लवकरात लवकर फॉरेन्सिक रिपोर्ट हा जनतेपुढे आणणार आहे, असल्याच त्यांनी म्हटलं आहे.

देशमुखांनी म्हटले की, ही घटना झाल्यानंतर लगेचच एसपींनी कोणत्याही रिपोर्टची वाट न पाहता राजकीय दबावापोटी या घटनेबद्दल उल्लेख केला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनीही म्हटले की, ही जी घटना आहे ती, सलीम जावेदची स्टोरी आहे. सुरूवातीपासूनच या घटनेला राजकीय रंग देण्यात आला. फॉरेन्सिक रिपोर्टनुसार, एका इसमाने गाडीवर लहान दगड मारला, एका इसमाने मोठा दगड मारला. त्यानंतर अनिल देशमुखांच्या गाडीची काच फुटून जखम अनिल देशमुखांच्या कपाळाला झाली.आता जो फॉरेन्सिक रिपोर्ट आला आहे, त्या फॉरेन्सिक रिपोर्टला धरून आम्ही योग्य ती कारवाई पुढे करू असे अनिल देशमुखांनी म्हटले. आरोपी सापडले नाहीत, यासंदर्भात रिपोर्ट द्यायला पाहिजे होता. मी फॉरेन्सिक रिपोर्ट पाहिला आहे. मी गृहमंत्री होतो..आम्हालाही मिळतात कागदं..पोलिस खात्याकडूनच मला तो रिपोर्ट बघायला मिळाला आहे असल्याच त्यांनी सागितलं.

दरम्यान अनिल देशमुखांनी या हल्ल्यानंतर आता सरकारवर आरोप केली आहेत. लवकरच मी हा रिपोर्ट दाखवेल, लवकरात लवकर फॉरेन्सिक रिपोर्ट हा जनतेपुढे आणणार आहेअसेही त्यांनी म्हटलं आहे.

