दयाबेन मालिकेत परतणार? तारक मेहताच्या चाहत्यांसाठी मोठी माहिती आली समोर…
मुंबई : टीव्ही मनोरंजन विश्वात ज्या मालिकेनं लोकप्रियतेचे उच्चांक गाठले त्या तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचा चाहतावर्ग मोठा आहे. आतापर्यत या मालिकेनं लहानांपासून ज्येष्ठांपर्यत अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
यामधील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अनेक प्रेक्षक कलाकारांना भरभरून प्रेम देतात. मात्र या पंधरा वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक कलाकारांनी या मालिकेतून निरोप घेतला होता.
पला आवडता कलाकार मालिकेत नसल्याने प्रेक्षक देखील ही मालिका पाहत नसल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता प्रेक्षकांची आवडती पात्र मालिकेत परत येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मालिका प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच प्रसूती रजेवर गेलेली दयाबेन अर्थात अभिनेत्री दिशा वाकानी मालिकेत परत येणार असणाऱ्या ज्या चर्चांवर निर्माते असिद मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी खात्रीनं सांगतो की, दयाबेन लवकरच प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसेल असेही सांगण्यात आले आहे. यानंतर चाहत्यांनी दयाबेनवर कौतूकाचा वर्षाव केला आहे.
दिशा वकानीने २०१७ पासून मॅटर्निटी लिव्ह वर असल्याचे सांगून तारक मेहता का उल्टा चष्मामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. चाहते बऱ्याच दिवसांपासून आपल्या आवडत्या अभिनेत्रीची खूप उत्सुकतेनं वाट पाहत आहेत.
प्रेक्षकांनी देखील दयाबेन त्या मालिकेतून गेल्यापासून खूपच तीव्रपणे आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्याचे दिसून आले आहे. जेठालाल आणि दयाबेन या मालिकेतील सर्वात महत्वाच्या व्यक्तिरेखा आहेत. अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे.
आता दिशा वाकानी म्हणजे दयाबेन खरंच तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत येणार का याबाबत आता प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.