प्रवाशांसाठी मोठी बातमी! लातूर -मुंबई वंदे भारत लवकर सुरू होणार?

पुणे : लातूर, धाराशिव जिल्ह्यासाठी महत्त्वाची बातमी.लातूर- पुणे- मुंबई वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.या विस्तारामुळे परभणी आणि नांदेड या जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. अशातच आता मराठवाड्यातील लातूर व धाराशिव जिल्ह्यातून पुणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे.

येत्या काळात लातूर – मुंबई वंदे भारत सुरू होणार आहे. विशेष म्हणजे ही गाडी धाराशिव, पुणेमार्गे चालवली जाणार आहे. पण ही गाडी नेमकी कधी सुरू होणार ? या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.लातूर – मुंबई वंदे भारतला मंजुरी मिळाली असा दावा केला जात असला तरी अद्याप रेल्वे बोर्डाने याचे नोटिफिकेशन काढलेले नाही. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला अजून या गाडीबाबत कोणतीच माहिती उपलब्ध झाली नसल्याचे म्हटले आहे.यामुळे जेव्हा याबाबत अधिकृत नोटिफिकेशन जारी होईल तेव्हाच याबाबत योग्य ती माहिती मिळणार आहे. पण जर ही गाडी सुरू झाली तर या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान मुंबई-लातूर वंदे भारत ट्रेन सीएसएमटी येथून सकाळी सहा वाजता सोडली जाणार असल्याचा दावा केला जातोय. या गाडीमुळे मुंबई ते लातूर हा प्रवास फक्त 7-8 तासांमध्ये पूर्ण होईल. त्यामुळे प्रवाशांचा तीन तासाचा वेळ वाचणार आहे. ही गाडी सुरू झाल्यानंतर या मार्गावरील सात महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे. यामुळे जर ही गाडी चालवली गेली तर नक्कीच या मार्गावरील प्रवाशांना फायदा होणार आहे.

