एमपीएससी परीक्षार्थींसाठी मोठी बातमी! मुख्य परीक्षेच्या तारखा बदलणार? दोन दिवसांत होणार अंतिम निर्णय…


मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल उशिरा लागल्याने स्पर्धा परीक्षार्थींमध्ये नाराजी वाढली आहे. पूर्व परीक्षाउत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी अपेक्षेपेक्षा कमी वेळ मिळत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ चा निकाल जवळपास ९० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जाहीर करण्यात आला. मुख्य परीक्षा २९ मार्च २०२६ रोजी नियोजित असल्याने उत्तीर्ण उमेदवारांना तयारीसाठी केवळ ३० दिवसांचा कालावधी मिळणार आहे.

या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून मुख्य परीक्षेची तारीख पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे. या विलंबामुळे लेखी आणि वर्णनात्मक स्वरूपाच्या मुख्य परीक्षेची सखोल तयारी करणे कठीण जात असल्याची भावना उमेदवार व्यक्त करत आहेत. राज्यभरातील हजारो स्पर्धकांवर या परिस्थितीचा परिणाम झाला आहे.

निकाल उशिरा लागल्याने आणि मुख्य परीक्षेची तारीख जवळ आल्याने आयोगाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काही विद्यार्थ्यांनी आयोगाच्या व्यवस्थापनातील त्रुटींमुळे त्यांना स्पर्धेत अडचणी येत असल्याचा आरोप केला आहे. आता आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक येत्या काही दिवसांत होणार असून मुख्य परीक्षेची तारीख पुढे ढकलण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक काही दिवसांत होणार आहे. या बैठकीत मुख्य परीक्षेच्या तारखेत बदल करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!