कॅबिनेट बैठकीपूर्वी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ; पीक नुकसानीसाठी 2,215 कोटींची मदत जाहीर..

पुणे : राज्यात विदर्भ, मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे महाराष्ट्रातील 70 लाख एकरवरील पीक हातचं गेलं आहे. या संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी आता सरकारने मोठी मदत जाहीर केली आहे. सध्या कॅबिनेट बैठक सुरू आहे, पण त्यापूर्वीच पीक नुकसानीसाठी 2215 कोटींची मदत जाहीर केली आहे.

विदर्भासह मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले आहे.यापूर्वीच्या नुकसानीचे आणि आताचे पंचनामे हे युद्धपातळीवर करण्यात येत आहे. आतापर्यंत जी आकडेवारी प्राप्त झाली आहे. त्यानुसार 32 लाख शेतकऱ्यांचं मोठं नुकसान राज्यात झाले आहे.त्यासाठी 2,215 कोटींच्या मदतीला मंजूरी देण्यात आली आहे. हा निधी आजच शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करता येणार आहे.यामध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांचा आणि मराठवाड्यातील धाराशिवसह नांदेड आणि बीडमध्ये मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या पट्ट्याचा समावेश आहे. तर आता पावसामुळे जे नुकसान झाले आहे. त्याचा आढावा सुद्धा घेतला जात आहे.

दरम्यान सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी मदत जाहीर करण्यात आली आहे. जून 2025 ते ऑगस्ट 2025 या दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील नुकसानग्रस्त गावांची, जिल्ह्यांची विभागवार आकडेवारी तयार करण्यात आली आहे. युद्धपातळीवर ही मदत आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.

