लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी मिळणार मे महिन्याचा हप्ता, जाणून घ्या..

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

लाडक्या बहिणींच्या खात्यात आत्तापर्यंत दहा हप्ते जमा करण्यात आले आहे. या योजनेचा दहावा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता २ ते ३ मे दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला.
एप्रिलचा हप्ता मे महिन्यात जमा झाला यामुळे मे महिन्याचा हप्ता कधी येणार हा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक होते. पण आता याबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींच्या मे महिन्याच्या हप्त्याच्या फाईलवर स्वाक्षरी केलेली आहे. यामुळे येत्या काही दिवसांनी प्रत्यक्षात लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे. या योजनेचा अकरावा हप्ता मे महिन्याच्या अखेरपर्यंत खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. आठ दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, जर या महिन्याअखेरपर्यंत पैसे जमा झाले नाहीत तर या योजनेचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो. मे महिन्याचा आता लांबणीवर पडला तर लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्यात दोन्ही हप्त्याचे पैसे मिळू शकतात. मात्र, लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या माध्यमातून याचा अकरावा हप्ता हा मे महिन्यातच मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.