मोठी बातमी! पाणंद रस्त्यांत खोडा घालणाऱ्या शेतकऱ्यांना दणका, राज्य सरकार लावणार कडक नियम..


पुणे : ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते’ योजनेत आता कडक नियमांची अंमलबजावणी होणार आहे. काही शेतकरी या योजनेत खोडा घालत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे महसूल खात्याला रस्ते करण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने मोठे पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खोडा घालणाऱ्या शेतकऱ्यांना धडा शिकवण्यात येणार आहे.

पानंद रस्त्यासाठी खोडा घालणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकार चांगला दणका देणार आहे.जे शेतकरी या योजनेत सहकार्य करणार नाही. अतिक्रमण हटवणार नाहीत. गावकीला आणि भावकीला वेठीस धरण्याचा आणि सरकारी योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न करतील. त्यांना राज्य सरकार धडा शिकवण्याचा विचार गांभीर्याने करणार आहेत. अशा शेतकऱ्यांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ न देण्याचा निर्णय लवकरच शासन दरबारी होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.इतकेच नाही तर बँकांना अशा शेतकऱ्यांना कर्जाचा पुरवठा न करण्याचा प्रस्ताव पण समोर असल्याचे समजते. त्यामुळे योजनेत खोडा घालणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.

बळीराजा पाणंद रस्ते योजनेत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याचे समोर आले आहे. अधिकाऱ्यांनी आणि गावातील ज्येष्ठ व्यक्तींनी सांगूनही हे अतिक्रमण करणारे शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यासाठी आता सरकारकडून मोठी पावले उचलली जात आहेत.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!