मोठी बातमी! उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक, कोणाला फटका बसणार? मतदानातून 11 खासदारांची माघार…


पुणे : देशाच्या 17व्या उपराष्ट्रपतीपदासाठीसाठी मतदान आज होणार आहे. या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए)उमेदवार सी. पी. राधाकृष्णन तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत होणार आहे. एकूण 782 खासदार या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र आहेत.हे खासदार पुढचा उपराष्ट्रपती कोण असणार हे ठरवणार आहेत.
दरम्यान संख्याबळाचा विचार करता एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांचे पारडे जड मानले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणाला फटका बसणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल आहे.

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 21 जुलै 2025 रोजी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्याने आज निवडणूक होणार आहे. संसद भवनात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार असून, मतमोजणी सायंकाळी ६ वाजल्यापासून सुरू होईल. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने इंडिया आघाडी व एनडीएमध्ये जोरदार टक्कर होणार आहे. या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पक्षाचा व्हीप लागू होणार नसल्याने क्ऱॉस वोटिंगचा धास्ती दोन्ही आघाड्यांना आहे. त्यामुळे देशाच्या नव्या उपराष्ट्रपतीपदी कोणाची वर्णी लागते हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये नसणाऱ्या काही पक्षांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. बिजू जनता दल आणि भारत राष्ट्र समिती या पक्षांनी मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही पक्षांचे 11 खासदार आहेत. या दोन्ही पक्षांची माघार भाजपच्या फायद्यासाठी असणार असल्याचे म्हटले जात आहे.

या निवडणुकीत विरोधकांच्या इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी काही चमत्कार करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीच्या मतांमध्ये अंतर असले तरी क्रॉस वोटिंग होईल का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!