मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून मुंबई पालिकेसाठी २१ नेत्यांची समिती जाहीर

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने पक्षाची मुख्य कार्यकारी समिती तयार करण्यात आलेली आहे. यात पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासह २१ शिलेदारांचा समावेश करण्यात आला आहे.

आगामी महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या पातळीवरील महत्त्वाचे निर्णय या समितीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. शिवसेनेचे प्रमुख नेते, खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार यांना मुख्य कार्यकारी समितीत संधी देण्यात आली आहे.यामध्ये १) एकनाथ शिंदे, मुख्य नेते२) रामदास कदम, नेते ३) गजानन कीर्तीकर, नेते४) आनंदराव अडसूळ, नेते ५) मीनाताई कांबळे, नेत्या६) डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार ७) रवींद्र वायकर, खासदार८) मिलिंद देवरा, राज्यसभा – खासदार ९) राहुल शेवाळे, माजी खासदार १०) संजय निरुपम, माजी खासदार ११) प्रकाश सुर्वे, आमदार १२) अशोक पाटील, आमदार १३) मुरजी पटेल, आमदार१४) दिलीप लांडे, आमदार
१५) तुकाराम काते, आमदार १६) मंगेश कुडाळकर, आमदार१७) श्रीमती मनिषा कायंदे, विधान परिषद, आमदार १८) सदा सरवणकर, माजी आमदार १९) यामिनी जाधव, माजी आमदार२०) दीपक सावंत, माजी आमदार २१) शिशिर शिंदे, माजी आमदार यांचा समावेश आहे.

ठाकरे बंधूंची जवळीक वाढलेली असताना आणि महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांच्या युतीची चर्चा जोर धरत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेसाठी रणनीती आखल्याच समोर येत आहे.

