मोठी बातमी!रामदास कदम यांच्या बायकोनं स्वतःला जाळुनं घेतल की जाळलं? अनिल परबांचा कदमांवर मोठा बॉम्ब..


पुणे : शिवसेना शिंदे गटाचा आणि ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.या दसरा मेळाव्यात शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बाळासाहेब ठाकरे यांचा देह दोन दिवस का ठेवला, बोटाचे ठसे का घेतले असे प्रश्न उपस्थित करत शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांनी आरोप केले.त्याला आता ठाकरें गटाचे अनिल परब यांनी प्रत्युत्तर देत कदमांवर मोठा बॉम्ब टाकला आहे.1993 मध्ये ज्योती रामदास कदम यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, जाळून घेण्याचा का प्रयत्न केला. जाळून घेतलं की जाळलं? असं म्हणत त्यानीं डिवचलं आहे.

1993 साली रामदास कदम यांच्या पत्नीने जाळून घेतलं की जाळल? या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे केली आहे. कदम यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा टाकणार असल्याचही त्यांनी म्हटले आहे.
आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून ही संस्कृती बंद करा, असा हल्ला अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर चढवला. तर गृहराज्यमंत्री आणि रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांनाही त्यांनी डिवचले.आज गृहराज्य मंत्र्याची ताकद दाखवताना डान्सबारवर जाऊन रेड मारल्याचं दाखवताना, मग स्वत च्या घरात काय चाललंय त्याची चौकशी करा. १९९३ मध्ये तुमच्या आईने का आत्महत्या करायचा प्रयत्न केला. स्वत: ला का जाळून घेण्याचा प्रयत्न कर. त्याची चौकशी केली पाहिजे. नार्को टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणी उद्धव सेनेचे नेते अनिल परब यांनी केली आहे. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी रामदास कदम आणि योगेश कदम या पित्रापुत्रांविरोधात आरोप केले आहेत.या अधिवेशनात जे पुरावे आले. मागच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी त्यांना वाचवलं आहे. आमचा मुख्यमंत्र्यांवर आरोप आहे. अशा लोकांना तुम्ही का वाचत आहात. तुमची अशी काय मजबुरी आहे. त्यांना का वाचवत आहेत. अस सवाल परब यांनी केला आहे..

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!