मोठी बातमी! अजित पवारांच्या अपघातानंतर DGCA ची कठोर पाऊले; VSR कंपनीच विशेष ऑडिट होणार….

पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने कडक पावले उचलत व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या चार्टर कंपनीचे विशेष ऑडिट जाहीर केले आहे. यामुळे या कंपनीवर आता टांगती तलवार असणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीला जात असताना विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. अपघात ग्रस्त झालेले हे विमान लेयर जेट 45 होते. हे विमान व्हीएसआर वेचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्लॅक लिस्टमध्ये असतानाही याची सेवा दिली जात होती.


दरम्यान या कंपनीकडे लिअरजेट 45 प्रकारचे विमान असून, याच विमानाला अपघात झाला होता. डीजीसीएच्या आदेशानुसार, या कंपनीचे आता विशेष ऑडिट होणार आहे. त्यानुसार कंपनीच्या देखभाल पद्धती, उड्डाण संचालन आणि सुरक्षा नियमांचे पालन यांची सखोल तपासणी होणार आहे.
या ऑडिटसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष टीम नेमण्यात आली आहे. ही टीम ठराविक कालावधीत संपूर्ण अहवाल सादर करणार असून, त्यात कोणतीही त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई केली जाऊ शकते., अपघातापूर्वीच्या काही महिन्यांतील उड्डाणांची नोंद, पायलट्सचे कामाचे तास आणि तांत्रिक देखभाल यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
डीजीसीएचे ऑडिट अहवाल आणि एअर इंडियाच्या तपासणीनंतरच पुढील निर्णय स्पष्ट होणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा संदेश या कारवायांमधून दिला जात आहे. या अहवालामधून येणाऱ्या माहितीवर कंपनीवर कारवाई केली जाणार आहे.
