मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार शरद पवारांच्या भेटीला ; तब्बल एक तास चर्चा, भेटीच कारण काय?

पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले काका अर्थात राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार याांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,साखर कारखान्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. माळेगाव येथील साखर कारखान्याच्या प्रश्नावर काका आणि पुतण्याची तब्बल तासभर बैठक झाली. विशेष म्हणजे, काकांची भेट घेण्यासाठी अजित पवार थेट वाय बी चव्हाण सेंटरवर पोहचले होते. या बैठकीतला तपशील अजून बाहेर आला नाही, मात्र या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
अलीकडेच जानेवारी महिन्यात शरद पवार आणि अजित पवार बारामती येथील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार काका पुतणे एकत्र आले होते. यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर दोन्ही नेते भेटल्याने निवडणुकीत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
