मोठी बातमी! लाडक्या बहिणींना ई -केवायसी करण्याची पुन्हा संधी, चूक दुरुस्त करता येणार,’या’ तारखेपर्यंत अंतिम मुदत..

मुंबई: ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या योजनेची ई- केवायसी करताना चुकीची माहिती भरल्यामुळे गेल्या काही महिन्यापासून हजारो लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयेचा हप्ता मिळालेला नाही.अशा अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना आता पुन्हा केवायसी मध्ये दुरुस्ती करता येणार आहे..

समोर आलेल्या माहितीनुसार, ज्या महिलांच्या अर्जात ‘कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी असणे किंवा निवृत्तीवेतन घेणे’ या पर्यायाबाबत चूक झाली आहे, अशा महिलांना आता 31मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर जाऊन दुरुस्ती करता येणार आहे.ही सुधारणा करण्याची अंतिम संधी असून यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.
सरकारकडून पोर्टलवर यासाठी आवश्यक तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी लाभार्थी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर (सांकेतांक: २०२६०२०६१२१२२३१३३०) पाहू शकतात. आपला लाभ सुरू ठेवण्यासाठी पात्र महिलांनी वेळेत e-KYC मधील ही सुधारणा करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई -केवायसी करण्यासाठी लाभार्थी महिलांना 31 डिसेंबर 2025 ची मदत देण्यात आली होती. मात्र काही महिलांकडून कुटुंबातील सदस्यांच्या सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतनाबाबतचा पर्याय निवडताना चुकीची माहिती भरली गेली. यामुळे पात्र असूनही अनेक महिलांचे अर्ज अपात्रतेच्या धोक्यात आले होते. आता पुन्हा त्यांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
