मोठी बातमी! दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना खासदार संजय राऊत पोलिसांच्या ताब्यात…

नवी दिल्ली : देशाच्या निवडणूक आयोगावर काँग्रेस नेते लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी जोरदार टीका केल्यानंतर सध्या वातावरण तापले आहे. याबात आज मतचोरी आणि ईव्हीएम मशीनच्या विरोधात काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांनी एल्गार पुकारला. संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत खासदारांनी मोर्चाचं आयोजन केलं.
असे असताना पोलिसांनी हा मोर्चा अडवला. त्यामुळे संतप्त झालेल्या खासदारांनी जागेवरच बसून ठिय्या आंदोलन सुरू केलं. जोरजोरात घोषणा देत असतानाच एका महिला खासदाराची प्रकृती बिघडली. त्यामुळे वातावरण अधिकच तापलं होतं. यावेळी पोलिसांनी राहुल गांधी संजय राऊत यांच्यासह अनेक खासदारांना ताब्यात घेतले.
लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक मतदार याद्यांमधील घोळ चव्हाट्यावर आणला. संविधानाने प्रदान केलेल्या ‘एक मतदार, एक मत’ या मूल्यावर आपली लोकशाही मार्गक्रमण करत असताना अनेक ठिकाणी एका मतदाराला अनेक मतांचा लाभ, अनेक ठिकाणी अस्तित्वात नसलेल्या मतदारांचे यादीत नाव, तर अनेक ठिकाणी खरोखर अस्तित्वात असलेल्या मतदारांना यादीतून गायब करण्यात आले.
हा घोटाळा पुराव्यानिशी समोर आल्यावर आता देशाचा नागरिक म्हणून निवडणूक आयोगाला याचा जाब विचारणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण, निवडणूक आयोगाने या अधिकारावरही बंधन आणले. यावर कळस म्हणून आता निवडणूक आयोगाच्या दिशेने निघालेल्या लोकप्रतिनिधींना पोलीसी बळाचा वापर करून रोखण्यात आले आहे.
‘जगातील सर्वात मोठी लोकशाही’ म्हणून ज्या देशाला नावाजले जाते, त्या देशात होत असलेली ही दडपशाही अत्यंत दुर्दैवी व निषेधार्ह आहे. जर निवडणूक आयोग निष्कलंक असेल आणि निवडणूका पारदर्शक पद्धतीने झाल्या असतील तर आयोगाला भीती कशाची वाटते? ‘कर नाही त्याला डर कशाला?’ हा प्रश्न प्रत्येक देशवासीयाच्या मनात आज उपस्थित होत आहे, असे खासदार अमोल कोल्हे म्हणाले.