मोठी बातमी! बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 91.88 टक्के, पुन्हा एकदा मुलींनीच मारली बाजी..


पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल 91.88 टक्के लागला आहे. निकालाकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

यामध्ये पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८८ आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ४२,३८८ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

त्यापैकी ४२,०२४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी १५,८२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.६५ आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ७,३१० दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दुपारी एक नंतर निकाल पाहता येणार आहे.

यामध्ये खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३६,१३३ एवढी आहे. त्यापैकी ३५,६९७ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहे. २९,८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८३.७३ आहे.

तसेच ७,२५८ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ६,७०५ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३८ आहे. दरम्यान, यामुळे 12 वीच्या विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यामध्ये गुणपडताळणी, उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी 6 मे ते 20 मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

याबाबत बोर्डाने माहिती दिली आहे. जाहीर होणाऱ्या या निकालावर विद्यार्थ्यांची पुढील दिशा ठरणार आहे. अनेक विद्यार्थी अभियांत्रिकी, वैद्यकीय, कला, वाणिज्य आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याची तयारी करत आहेत. सध्या स्पर्धा वाढल्याने मोठी चुरस निर्माण होत असते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!