मोठी बातमी! भाजपा नेते नारायण राणे रुग्णालयात दाखल ; तातडीने शस्त्रक्रिया होणार, काय आहे कारण?

पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांच्यावर नेमकी कोणती शस्त्रक्रिया होणार हे अद्याप समोर आलेले नाही.

नारायण राणे हे भाजपचे जेष्ठ नेते असून भाजपमध्ये येण्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. त्यांची राजकीय सुरुवात ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतुन झाली होती. कट्टर शिवसैनिक असलेल्या राणेंना बाळासाहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवलं होतं तर सध्या नारायण राणे यांची दोन्ही मुलं राजकारणात असून दोघेही आमदार आहेत. मात्र अचानक नारायण राणे रुग्णालयात दाखल झाल्यामुळे राणेंच्या समर्थकांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झाल आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नारायण राणेंना डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिल्यामुळे त्यांना तातडीने मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. आज त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

