मोठी बातमी! भाजपचा बडा नेता ‘शिवतीर्था’वर राज ठाकरेंच्या भेटीला ; मुंबईत मोठ्या घडामोडी


मुंबई : मुंबईत आगामी महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना आता मुंबईत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राज्याचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होण्याचे संकेत मिळत आहेत. दोन्ही पक्ष एकत्र आल्यास मुंबईतील समीकरणांवर काही परिणाम होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे राज ठाकरे यांच्या मनसेची भूमिकाही निर्णायक राहण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या मनसेला आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आल आहे.

मात्र आता या भेटीचे कारण समोर आल असून मुंबईतील कबुतरखान्याच्या मुद्यावर मंगलप्रभात लोढा यांनी ही भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लोढा यांनी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कबुतरखाना सुरू केला. त्यावेळी त्यांनी मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये एक कबुतरखाना सुरू करणार असल्याचे म्हटले. लोढा यांच्या या वक्तव्यावरून वाद पेटणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग येणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!