मोठी बातमी! काँग्रेसला सर्वात मोठा दणका, बडा नेता करणार भाजपात प्रवेश करणार..

मुंबई : राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. मात्र आता त्याचपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे धुळे जिल्ह्यात आता भाजपाचं बळ वाढणार आहे.
यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांसह सरपंच, उपसरपंच आणि बाजार कमिटी सभापती, संचालकांचा समावेश आहे. धुळे तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते आजच मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. हे कार्यकर्ते कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता.
या मेळाव्यात त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. कार्यकर्त्यांचा विचार घेऊन आपन निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या मेळाव्यात काँग्रेसच्या एकाही नेत्याचा फोटो नव्हता, तेव्हाच कुणाल पाटील हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर ते आता उद्याच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
एवढ्या मोठ्या संख्येनं भाजपात प्रवेश होणार असल्यानं जिल्हयात काँग्रेसला मोठा खिंडार पडलं आहे. धुळे जिल्ह्यात कुणाल पाटील यांची मोठी ताकत आहे. त्यांना याठिकाणी मानणारा वर्ग मोठा आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीला गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे.
महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. पक्षाला लागलेली गळती महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरत आहे. काँग्रेससह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केले आहेत. यामुळे येणाऱ्या काळात येणाऱ्या निवडणुकीत भाजपची ताकद वाढणार आहे.