मोठी बातमी! महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी PSI बदने याच्यावर सर्वात मोठी कारवाई ; खात्यातून अखेर…..

पुणे : फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले होते. मात्र आता त्याच्यावर मोठी कारवाई करत बदनेला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गोपाळ बदनेला सेवेतून केले बडतर्फ केले आहे. बदने सध्या न्यायालयीन कोठडीत असून पोलीस दलाची प्रतिमा मालिन केल्याचा ठपका ठेवत त्याला बडतर्फ करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?
महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या हातावर एक सुसाईड नोट लिहीली होती. माझ्या मृत्यूसाठी PSI गोपाळ बदने हा जबाबदार आहे, त्याने 4 वेळा माझ्यावर अत्याचार केला. तसेच, प्रशांत बनकर यानेही गेल्या चार महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला असं महिला डॉक्टरने तिच्या नोटमध्ये लिहीलं होतं.या PSI गोपाल बदनेचे इतरही अनेक कारनामे समोर आले होते. त्याने फक्त मृत महिला डॉक्टरलाच नव्हे तर काही इतर महिलांनाही त्रास दिला होता अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता त्याच्यावर मोठी कारवाई करत त्याला खात्यातून बडतर्फ करण्यात आल आहे.

कोण आहे PSI बदने ?
गोपाळ बदने हा गेल्या 2 वर्षांपासून फलटण पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.याआधी तो फलटण तालुक्यातील बरड पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होता.गोपाळ बदने हा विवाहित असुन तो मूळचा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील चांदापूर गावचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे