ब्रेकिंग! पुण्यातील बहुचर्चित वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट ; सहाही आरोपींचे आरोप निश्चित,आता 23 फेब्रुवारीला.

पुणे: पुण्यातील बहुचर्चित वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे.या हुंडाबळी प्रकरणात सत्र न्यायालयाकडून सहा आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले आहेत.जुलै महिन्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. आता न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले असून खटल्याची सुनावणी 23 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल आहे.

सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली होती. आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती घेत पिंपरी चिंचवड पोलिसांनी सोमवारी 14 जुलै रोजी 11 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. वैष्णवीच्या मृत्यूनंतर 58 दिवसांनी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं होतं. यात राजेंद्र हगवणे, त्यांची पत्नी, दोन मुलं, एक मुलगी आणि इतर सहा जणांचा समावेश आहे.आता सत्र न्यायालयाने सहा आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत.
पोलिसांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तिचा पती शशांक हगवणे,सासू लता हगवणे, ननंद करिष्मा हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे,दीर सुशील हगवणे आणि कुटुंबीय निलेश चव्हाण यांना अटक केली. या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी असल्याने आता पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले होते.मग तपासाची सूत्र वेगाने हलू लागली.

वैष्णवीचा मृतदेह भुकूम येथील सासरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. शवविच्छेदन अहवालात शरीरावर जखमांच्या खुणा असल्याचे नमूद झाल्याने आत्महत्या की खून? याबाबत संशय निर्माण झाला होता अशातच आता आरोप निश्चिती करण्यात आली आहे.त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.