मोठी बातमी! धनंजय मुंडे यांना मोठा धक्का, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला मोठा निर्णय…

बीड : येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. असे असताना अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कृषिमंत्री असताना त्यांनी घोटाळा केला असल्याचे पुरावे त्यांनी आज दिले आहेत. यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
असे असताना आता अजित पवारांनी मोठा निर्णय घेतला आहे. मागील दोन वर्ष धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. या काळात झालेल्या कामांची आता सखोल चौकशी होणार आहे. यामुळे मुंडेंच्या अडचणी वाढल्या असल्याचे बोलले जात आहे. यामुळे मुंडे अडचणीत आले आहेत.
मुंडेंच्या आरोपांची पक्षांतर्गत चौकशी होणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया या अजितदादांना भेटल्या. यावेळी त्यांनी काही कागदपत्रे दाखवली. काही पुरावे दाखवलेत त्यावर अजित दादा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्ट उत्तर देतील, असेही धनंजय मुंडे म्हणाले होते.
दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे हे आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देतील अशी चर्चा होती. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज कॅबिनेटची बैठक आहे. यावेळी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात आधीच बैठक झाली..यामुळे राजीनामा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्पेअर, मेटाल्डे हाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा, यामध्ये मुंडे यांनी भ्रष्टाचार केला. मुंडे यांनी १९ लाख ६८ हजार ४०८ बॉटल या २२० रुपयाने घेतल्या. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किंमतीने बॉटल घेतल्या, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.