मोठी बातमी! पुण्यात ईडीची मोठी कारवाई, वेंकटेश्वरा हॅचरीज प्रायव्हेट लिमिटेड आणि तिच्या उपकंपनीच्या ६५ कोटींची मालमत्ता जप्त..!
पुणे : सक्त वसुली अंमलबजावणी संचालनायालय अर्थात ईडीने मोठी कारवाई केली आहे. पुणे शहरातील वेंकटेश्वरा हॅचरीज आणि तिची उपकंपनी व्हीओएलच्या नऊ मालमत्ता जप्त केली आहे. या मालमत्तेची किंमत ६५ कोटी ५३ लाख रुपये आहे. जप्तीमुळे एकच खळबळ उडाली आहे.
सक्तवसुली अंमलबजावणी संचालनाच्या माध्यमातून ही जप्ती करण्यात आली असून, महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील या सर्व मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. याची चौकशी २०११ पासून सुरू होती असे सांगितले जात आहे.
यामध्ये व्हीओ एल च्या व्यवसायात व्यंकटेश्वरा हॅचरीजने मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार केला आणि भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडियाचे नियमांचे उल्लंघन केल्याचे ईडीला दिसून आले.
दरम्यान, वेंकटेश्वरा हॅचरीज कंपनीतून व्हीओएल कंपनीला इक्विटी इनफ्युजन च्या नावाखाली निधी पाठवला गेला मात्र तिथे कोणतेच उत्पादन झाले नव्हते.
यामध्ये ६५ कोटींचा झालेला व्यवहार आणि त्यातून अलेक्झांडर हाऊस सारख्या खरेदी केलेल्या स्थावर मालमत्ता हे व्यवहारातील गैरप्रकार असल्याची इडीने निष्पन्न केले.