मोठी बातमी!अनंत गर्जे प्रकरणात रूपाली पाटलांची मोठी मागणी ; खरी गुन्हेगार अनैतिक संबंध ठेवणारी…..


पुणे : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जेची पत्नी डॉ गौरी पालवे-गर्जे हिने शनिवारी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणातील धक्कादाय खुलासे समोर येत असतानाच आता,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावरुन अनंत गर्जे प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणातील खऱ्या गुन्हेगार महिलेला आरोपी करावं अशी मागणी त्यांनी केली आहे.

रुपाली पाटील यांची सोशल मीडिया पोस्ट

“अशा घटना अत्यंत दुर्दैवीच असतात. डॉ गौरी यांच्या वडिलांचा आक्रोश पाहिला. श्रीमंताला पोरी देऊ नका असे म्हणत ओक्साबोक्शी रडत होते, एक बाप हतबल होता. पण घरातील माणसाने आत्महत्या केल्यावर हे कळण्यापेक्षा, आधीच घरातील लोकांनी संवाद, समन्वय असणे फार फार महत्त्वाचे आहे. मुळामध्ये मुलींना सक्षम बनून त्यांची मानसिक स्थिती ही माहेरचे किंवा सासरचे दोघांकडे एक समंजसपणाचे वागणे हे फार महत्त्वाचे आहे.” असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.

“डॉक्टर जरी असली तरी त्या सिच्युएशनला या नवरा बायकोच्या भांडणांमध्ये नवऱ्याचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर यावरुन झालेले वाद हे फार महत्त्वाचे आहेत.नवऱ्यावर, सासूवर तसेच नणंद यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. त्याचप्रमाणे जिच्या सोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं, त्या महिलेला सुद्धा गुन्ह्यात आरोपी करणे गरजेचे महत्वाचे आहे.” असं मत रुपाली पाटलांनी व्यक्त केलं आहे.

एक घर एक महिला उभे करू शकते तसेच ती महिला जर एखाद्याचे घर संपवण्याचे कारण बनू शकते, अशा बेकायदेशीर संबंध कृत्य करणाऱ्या, अनैतिक संबंध ठेवणाऱ्या महिलांवर सुद्धा गुन्हा दाखल केलाच पाहिजे. त्याशिवाय कुटुंब वाचणार नाहीत, कुटुंब सुरक्षित राहणार नाहीत. आणि अनैतिक संबंध करण्याचे धाडस करणार नाही. यामुळे कुटुंब वाचतील.” असं परखड मत रुपाली पाटलांनी मांडलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!