मोठी बातमी! बालेकिल्यातच पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंना मोठा धक्का, जय भगवान महासंघ टक्कर देणार?


पुणे : राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या तोंडावरच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला असलेल्या मराठवाड्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे.जय भगवान महासंघाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे मुंडे बंधू-भगिनींना मोठा धक्का बसणार आहे.

मराठवाड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पकंजा मुंडे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. जय भगवान महासंघाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जय भगवान महासंघ उतरणार आहे. मराठवाड्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्वच ठिकाणी जय भगवान महासंघ उमेदवार देणार आहे. जो कोणी ओबीसींचा विचार करेल असेच नेते आमच्या सोबत राहतील असं म्हणत बाळासाहेब सानप यांनी आता थेट धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना आव्हानच दिले आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

दुसरीकडे जय भगवान महासंघ निवडणूक रिंगणात उतरत असल्यामुळे मराठवाड्यातील ओबीसी नेत्यांना आता हे एक प्रकारे आव्हानच मानलं जात आहे. वंजारी समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करावा ही मागणी आम्ही निवडणुकीच्या काळात देखील लावून धरणार आहोत, आणि त्याच माध्यमातून आता येणारी निवडणूक आम्ही लढणार आहोत, असं सानप यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!