Big News : अजित पवार गटाला मोठा धक्का, नियम व अटी न पाळल्याने मोठा निर्णय, नेमकं घडलं काय.?
Big News पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर आता अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट तयार झालेत. अशातच राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हासाठी या दोन्ही गटाकडून दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप सुरू असताना मोठी बातमी समोर येत आहे. अजित पवार गटाला ट्वीटरकडून मोठा झटका बसला आहे. (Big News)
ट्विटरने अजित पवार गटाचे ट्विटर अकाउंट सस्पेंड केले आहे. ट्विटरचे नियम न पाळल्यामुळे कारवाई केली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने या नावाने नवीन ट्विटर अकाऊंट सुरु केले होते. परंतु मागील दोन दिवसांपासून ते सस्पेंड केले आहे.
त्यानंतर अजित पवार गटाने लगेचच ट्विटरला मेल केला आहे. त्यात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांचे ट्विटर अकाऊंट पुन्हा सक्रिय होईल, अशी अजितदादा गटाला आशा आहे.
पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट सोशल मीडियावर खूप सक्रिय झाले आहेत. प्रत्येक सभेची, पत्रकार परिषदेची तसेच इतर माहिती यावर टाकली जात आहे.
मिळालेल्या माहिती नुसार अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे ट्वीटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्वीटरचे नियम पाळले नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवार गटानं ट्वीटरचं NCPspeaks_official असे नवे अकाऊंट तयार केले होते.
मात्र हेच अकाऊंट आता सस्पेंड करण्यातच आले आहे. या ट्वीटर अकाऊंटवर शरद पवार गटाकडून दावा करण्यात आला होता. शरद पवार गटाकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर हे अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे.