मोठी बातमी! राज्यातील तब्बल 72 राजकीय नेते- प्रशासकीय अधिकारी ‘हनी ट्रॅप’ मध्ये ; राजकीय वर्तुळात खळबळ


पुणे : राज्यातील तब्बल 72 वरिष्ठ सरकारी आणि अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याचा खळबळजनक दावा एका राजकीय नेत्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज्यातील एका बड्या नेत्याने अनौपचारिक गप्पांदरम्यान राज्यातील तब्बल ७२ वरिष्ठ अधिकारी आणि काही आजी-माजी मंत्री ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाचे पडसाद मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, आणि औरंगाबाद यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये पसरलेले आहे. दरम्यान अडकलेल्या काही संशयित अधिकाऱ्यांनी तातडीने आपले मोबाईल फोन फॉर्मेट केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच, या प्रकरणात अडकलेले काही अधिकारी आणि राजकीय व्यक्तींनी आपले संबंध लपवण्यासाठी तसेच माहिती दडवण्यासाठी परस्परांमध्ये समन्वय साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.या प्रकरणाची सध्या गुप्त पद्धतीने चौकशी सुरु आहे. या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यात अनेक बड्या नेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गुप्त चौकशीतून नेमकं काय बाहेर येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!