मोठी बातमी : दणक्यात युतीची घोषणा, पण जागा वाटपावर मौन, ठाकरेंच्या निर्णयामागचं ‘राज’काय?

पुणे :महाराष्ट्र नवनिर्माण सेनाआणि शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) अधिकृतपणे युतीची घोषणा केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीची दणक्यात घोषणा केली आहे.मात्र, जागा वाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात ठेवला. या मागील कारण काय, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राज ठाकरे म्हणाले कीं, कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे या विचारातून ही एकत्र येण्याची सुरुवात झाली. ही युती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महत्त्वाची मानली जात आहे, ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका देखील समाविष्ट आहेत. युतीमधील जागावाटपाचे आकडे किंवा तपशील सध्या जाहीर करण्यात आले नाहीत. त्यामागे काय कारण आहे याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पुढे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, आकड्यांचा खेळ सध्या महत्त्वाचा नाही. ही युती केवळ मुंबईपुरती मर्यादित नसून, महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकांमध्येही तिचे पडसाद उमटतील असे संकेत देण्यात आले. भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेला राज ठाकरेंनी प्रत्युत्तर देत, मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

यावेळी उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी जागा वाटपाची घोषणा केली. नाशिक, पुणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, ठाणे आदी महापालिकांमधील जागा वाटपांबाबत दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याचे समोर आले आहे.

ठाकरे गट आणि मनसे यांची मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक, मीरा-भाईंदर, छत्रपती संभाजीनगर आदी महापालिकांमध्ये युतीच्या माध्यमातून लढणार आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. शिवसेना आणि मनसे ही निवडणूक एकत्रितपणे लढणार आहे. त्यामुळे आगामी काळात युती बाजी मारणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
