मोठी बातमी! मंत्रालयातील फाईलसंदर्भात अजितदादांना ‘ त्या’ नेत्याचा फोन अन् कारने जाण्याचा निर्णयच बदलला ; कोणी केला धक्कादायक दावा?

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अनेक शंका आणि प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या फोननंतर अजित पवार यांनी प्रवासाचा निर्णय बदलला, असा मोठा दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने आता अजित पवारांच्या यांच्या निधनामागचं गूढ अधिकच वाढत जात आहे.

याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, प्रफुल पटेल यांनी मंत्रालयातील फाईलसंदर्भात अजितदादांना फोन केला होता. तो फोन आल्यानंतरआधीच गाडीत टाकलेल्या बॅगा पुन्हा उतरवल्या आणि चार्टर्ड फ्लाइटने जाण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला. हीकागदपत्रे,आणण्यासाठी त्यांनी सिक्युरिटीला फोन केला होता. मंत्रालयातून फाईल आणायला सुमारे साडेसात ते आठ वाजते होते. त्यामुळे रात्रीच रोडने जाण्याचा पर्याय रद्द करण्यात आला, असं खळबळजनक वक्तव्य प्रमोद हिंदुराव यांनी केलं आहे.
शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनीसुद्धा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्यांवर सवाल उपस्थित केला आहे. “अजित पवार गटाचे नेते मूग गिळून गप्प का आहेत? रोहित पवार यांनी उपस्थित केलेले प्रश्न अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांना का पडत नाहीत? असा हल्लाबोल त्यांनी चढवला आहे.

28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याने अख्ख्या महाराष्ट्राला धक्का बसला.पाच जणांसह चार्टर्ड फ्लाइटने बारामतीला जात असताना लँडिंगदरम्यान ते विमान कोसळलं. या अपघातात पायलटसह विमानातील सर्व पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.