मोठी बातमी! महाराष्ट्र ऑलिम्पिक निवडणुकीसाठी अजित पवारांच्या पॅनलची घोषणा; 21 उमेदवार कोण?

मुंबई : नुकतीच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ऑलिम्पिक पॅनेलची घोषणा करण्यात आली आहे. येत्या रविवारी होणाऱ्या एमओए निवडणुकीत अजित पवार गटाचे २१ उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यापैकी ३ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

मुंबईत २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीच्या ऑलिम्पिक पॅनलची घोषणा अर्जुन पदक विजेते अशोक पंडित आणि ध्यानचंद पदक विजेते प्रदीप गंधे यांनी केली आहे. ३० मतदार संघटनांपैकी २२ पेक्षा अधिक संघटनांनी अजित पवार यांना आपला पाठिंबा जाहिर केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलचे उमेदवार पुढीलप्रमाणे

     
   
अध्यक्ष – अजित पवार, वरिष्ठ उपाध्यक्ष – अशोक पंडित, उपाध्यक्ष – आदिल सुमारीवाला- (बिनविरोध निवड), उपाध्यक्ष- प्रदिप गंधे, (बिनविरोध निवड) उपाध्यक्ष – प्रशांत देशपांडे, (बिनविरोध निवड), उपाध्यक्ष – दयानंद कुमार , (बिनशर्त पाठिंबा) सचिव – नामदेव शिरगांवकर, सहसचिव – निलेश जगताप, उदय डोंगरे, मनोज भोरे, चंद्रजीत जाधव, खजिनदार – स्मिता शिरोळे, कार्यकारिणी सदस्य – संदीप चौधरी, संदीप ओंबासे, राजेंद्र निम्बाते, गिरीश फडणीस,रणधीरसिंग,किरण चौगुले,समीर मुणगेकर,संजय वळवी, सोपान कटके आदी.
यापूर्वीच उपाध्यक्ष पदासाठी आदिल सुमारीवाला, प्रदिप गंधे आणि प्रशांत देशपांडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेतील २२ पेक्षा अधिक संघटनांनी पुण्यातील बैठकीत उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांना जाहिर पाठिंबा दिला आहे. ही कुठलीही राजकीय निवडणूक नाही. त्यामुळे मी स्वतःही कोणतेही राजकीय विधान केलेले नाही.कोणी राजकीय रंग देत असतील तर ती महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झाली पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
 
				
