मोठी बातमी! लातूर येथील राड्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण देणार राजीनामा!! अजित पवारांचा मोठा निर्णय..

लातूर : काल लातूर याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा राडा झाला. खासदार सुनील तटकरे यांना शेतकऱ्यांबाबत प्रश्न विचारणाऱ्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी मारहाण केली. यामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे.
असे असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवार म्हणाले, घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो. समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय्य मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही, समता व बंधुत्वाच्या विचारांवरच उभी आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, सामाजिक जीवनात काम करत असताना नेहमी लोकशाही, शांतता आणि अहिंसा या मुल्यांना प्राधान्य द्या.
असेही अजित पवार म्हणाले आहेत. यामुळे आता प्रकरण थांबणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर आता सूरज चव्हाण अजून काही बोलले नाहीत. यामुळे ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून राज्यात सध्या वातावरण तापले असून छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.