मोठी बातमी!कोकाटेनंतर आता आणखीन एक मंत्री रडारवर ; रोहित पवारांकडून मंत्र्यांचा ‘तो ‘व्हिडिओ पोस्ट..

पुणे: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळात मोबाईलवर पत्ते खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर कोकाटेंच कृषीखात काढून त्यांना क्रीडा खात्याची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर आता रोहित पवारांनी भाजपच्या राज्यमंत्री आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रोहित पवार यांनी राज्यमंत्री मेघना बर्डीकर यांचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. ‘ असं कुणाचं काम केलं ना तर याद राख, मेघना बोर्डिीकरचा शब्द आहे, कानाखाली घालील आता, आत्ताच्या आत्ता बडतर्फ करुन टाकेल,’ असा इशारा या व्हिडीओमधून देण्यात आला आहे. तसेच त्या म्हणाल्यास,चमचेगिरी कोणाची करायचे नाही याद राखा, काय काम करतो मला माहिती नाही का, मी मुद्दाम सिओ मॅडमला इथे बोलावलं आहे, हमाली करायचे ना तर नोकरी सोडून दे असं त्या व्हिडिओत मेघना बोर्डीकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात? देवेंद्र फडणवीस साहेब काय सज्जन मंत्री शोधलेत आपण! तुमच्या मंत्रिमंडळाची तर इज्जत जातेच, पण यापेक्षाही महाराष्ट्राची बेअब्रू होतेय, याची जास्त चिंता आहे. कृपया यांना आवरा..!’ असं कॅप्शन या व्हिडीओला रोहित पवार यांनी दिलं आहे. आता या व्हिडिओवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.