मोठी बातमी! जयंत पाटलांच्या राजीनाम्यानंतर रोहित पवारांना लॉटरी, पक्षात मोठी जबाबदारी मिळणार
Big news! After Jayant Patil's resignation, Rohit Pawar will get lottery, big responsibility in the party

पुणे : जवळपास सात वर्षापासून शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा वाहणारे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर माजी मंत्री शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.दरम्यान, आता लवकरच शरद पवारांच्या पक्षात मोठे फेरबदल होणार असल्याचे, समोर आले आहे. विशेष म्हणजे यावेळी पवार कुटुंबातीलच आमदार रोहित पवार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येत्या काही दिवसांत मोठी खांदेपालट होणार आहे. आता लवकरच पक्षाचे सचिव म्हणून आमदार रोहित पवार यांच्यावर जबाबदारी सोपवली जाणार आहे. पक्षातील सर्व आघाड्यांचे प्रमुख म्हणून रोहित पवार यांच्याकडे जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.रोहित पवार यांना पक्षात सचिवपद मिळणार असल्यामुळे भविष्यात नेमकं काय घडणार? महत्त्वाच्या पदावर पवार कुटुंबातील नेत्याची नेमणूक झाली तर पुढे काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राज्यातील प्रत्येक प्रश्नांना आणि अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करत राहील. तसेच पक्ष संघटना राज्यात सगळीकडे पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू, या संधीचे 100% सोने करण्याचा प्रयत्न मी करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
