मोठी बातमी! धनंजय मुंडे यांच्यानंतर आता राष्ट्रवादीला मोठा धक्का, मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोडलं पालकमंत्रीपद, नेमकं काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात काल अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर मुख्य आरोपी वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती असल्याने काल मंत्रिपदाचा धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. यामुळे एकच खळबळ उडाली.
गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत मागणी केली जात होती. अखेर काल राजीनामा देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसला दुसरा धक्का बसला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली आहे. यामुळे राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय हे समोर येत नाही.
वाशिमचे पालकमंत्री पदाची जबाबदारी आता राष्ट्रवादीचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. मात्र हसन मुश्रीफ यांनी ही जबाबदारी का सोडली याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. याबाबत अजून कोणती प्रतिक्रिया समोर आली नाही.
सध्या राज्याचे अधिवेशन सुरू असून राज्य सरकारला विरोधकांनी कोंडीत पकडण्याचे काम सुरू केले आहे. अनेक मंत्र्यांची बेताल वक्तव्य समोर येत असून राज्यात देखील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यामुळे विरोधकांनी अनेकांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यातच काल संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं.
यामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. आता येणाऱ्या काळात इतर अनेक मंत्री अडचणीत आले असल्याने कोण कोण राजीनामा देणारे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे राज्य सरकार काहीसे अडचणीत आल्याचे दिसून येत आहे.