मोठी बातमी! बिहारनंतर देशात मतदार पडताळणी मोहीम राबवणार, महाराष्ट्रातही काम करणार, मोहिमेचा उद्देश काय?


पुणे : आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र या निवडणुकीपूर्वी मतदार यादी पूर्णपणे अचूक आणि आद्ययवत करण्यासाठी आता निवडणूक आयोग मोठी मोहीम हाती घेणार आहे. बिहार नंतर आता संपूर्ण देशात मतदार तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्रात ही निवडणुकीपूर्वीही काम पूर्ण करण्यात येणार आहे. मतदार यादीची अचूकता वाढवण्यासाठी आयोगाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

निवडणुकीतील बोगस मतदारांना बाहेर काढण्यासाठी आयोग स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या विशेष तपासणी मोहिमेवर भर देत आहे. अशा प्रकारची मोहीम 25 जून 2025 पासून बिहारमध्ये यशस्विपणे राबवण्यात आली. याच धर्तीवर संपूर्ण देशाबरोबर महाराष्ट्रात ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत मतदार यादीतून मयत झालेल्या मतदारांची नावे वगळली जातील,जेणेकरून यादीतील बोगस मतदारांची संख्या कमी करता येईल.ही संपूर्ण तपासणी मोहीम निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

मोहिमेचा उद्देश काय?

या सखोल पुनरीक्षणाचा मुख्य उद्देश मतदारांच्या जन्मस्थानाची तपासणी करून बेकायदेशीर परदेशी घुसखोरांना मतदार यादीतून वगळणे हा आहे. आता जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा थेट निवडणूक यंत्रणेची जोडला जाणार आहे.याशिवाय आरजीआय आणि महापालिकांचा डेटा देखील आयोगाला उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील तीन स्वराज्य संस्थांमधील डेटांचा वापरही या तपासणीसाठी केला जाणार आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निपक्ष आणि विश्वसनीय मतदार यादीच्या आधारे पार पडण्यास मदत होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!