शरद पवारांच्या तब्येतीसंदर्भात मोठी माहिती समोर, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती, कधी मिळणार डिस्चार्ज?


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सौम्य डिहायड्रेशनमुळं रविवारी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, दोन दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

वैद्यकीय पथकाने दिलेल्या माहितीनुसार, पवार यांची तब्येत सध्या स्थिर आहे. त्यांनी पुरेसा आराम केला असून सर्व तपासण्यांचे अहवाल समाधानकारक आले आहेत. ते नियमित आहार घेत आहेत आणि त्यांची प्रकृती चांगली आहे.

पुढील दोन दिवस विश्रांतीनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यानंतर काही दिवस ते पुण्यातच राहतील आणि मग मुंबईकडे रवाना होतील, असेही डॉक्टरांनी सांगितले.

उलट्यांमुळे झालेल्या डिहायड्रेशनमुळे त्यांना सलाईन देण्यात आली. रक्ततपासणी तसेच सिटीस्कॅनसह सर्व आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या सर्व तपासण्यांचे निकाल सामान्य आल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोणतीही गंभीर चिंता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

यापूर्वीही प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील आठवड्यात छातीत कफ झाल्याने त्यांना बारामतीहून पुण्यात आणण्यात आले होते आणि पाच दिवस उपचार करण्यात आले होते.

त्यावेळीही प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. आता पुन्हा उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील 48 तासांत डिस्चार्ज मिळणार असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!