मोठी बातमी! राज्यातील 8 बड्या शहरांना मिळाले महापौर, पिंपरी चिंचवडमध्ये कोणाला संधी?

पुणे : महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महापौर आणि उपमहापौर निवडीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं. आज राज्यातील विविध महानगरपालिकांच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये भाजप आणि महायुतीचे सर्वाधिक महापौर निवडून आले आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड शहराच्या 27व्या महापौरपदी भाजपचे रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

आज जळगाव, धुळे, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, सोलापूर आणि नाशिक या ८ महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये आज महापौर निवडीची प्रक्रिया पार पडली. यात सोलापूर, जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये अत्यंत चुरशीच्या वाटणाऱ्या निवडणुका अखेर बिनविरोध झाल्या. तर नागपूर आणि धुळ्यात भाजपने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.
श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे रवी बाबासाहेब लांडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच भाजपच्या शर्मिला बाबर यांचीही उपमहापौर पदी बिनविरोध निवड झाली आहे.

सोलापूर – भाजपचे विनायक कोंड्याल
जळगाव – दीपमाला काळे (भाजप) यांची महापौरपदी वर्णी तर मनोज चौधरी (शिवसेना-शिंदे) यांची उपमहापौर पदी निवड
अहिल्यानगर -ज्योती गाडे (राष्ट्रवादी-AP) यांची महापौरपदी वर्णी तर धनंजय जाधव (भाजप) उपमहापौरपदी
नागपूर -नीता ठाकरे (भाजप) महापौरपदी निवड.
धुळे – मायादेवी परदेशी (भाजप) यांची महापौरपदी निवड तर ज्योत्स्ना पाटील यांची उपमहापौरपदी निवड.
नाशिक – हीमगौरी आडके (भाजप) महापौर पदी निवड तर विलास शिंदे (शिवसेना-शिंदे) उपमहापौर पदी निवड.
संभाजीनगर- समीर राजूरकर (भाजप) महापौरपदी निवड तर राजेंद्र जंजाळ (शिवसेना-शिंदे) यांची उपमहापौरपदी.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी रूपा राणी निकम यांची निवड झाली आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या बड्या शहरांना आता महापौर मिळाले आहेत.