मोठी बातमी! ’48 तास काम अन् 3 दिवस भरपगारी सुट्टी ‘; राज्य सरकार कामगार संहितेत करणार बदल


पुणे : इंग्लंड, फ्रान्स,जर्मनी,जपान यासारख्या विकसित देशात प्रचलित असलेली ‘आठवड्यात 48 तास काम करा आणि 3 दिवस सुट्टी घ्या ‘ही पद्धत आता राज्य सरकार अमलात आणण्याच्या तयारीत आहे.त्यानुसार कामागारांनी 3-4 दिवसात 48 तास काम करायचे आहे. त्यानंतर पुढचे तीन दिवस सुट्टी घ्यायची आहे. कामाचे हे तास कामगार आणि मालक यांच्या संमतीने ठरणार आहे.

केंद्र सरकार गेल्या वर्षी सर्व राज्यांना लागू केलेल्या चार नवीन कामगार संहितांमध्ये सुधारणा करून कामगार विभाग ही आचारसंहिता लागू करणार आहे.देशात दिवसाला आठ दिवस आणि आठवड्याला 48 तास काम करण्याची मर्यादा आहे. रोज 12 तास काम करण्याची मर्यादा करण्याचा प्रस्ताव सरकारने मंजूर केला आहे. त्याला कामगार संघटनांनी विरोध केला आहे. आठवड्यात कामाचे 48 तास करुन केंद्र सरकारच्या नवीन संहितेत सुधारणा करण्याचे सरकारने ठरवले आहे.

नवीन नियमानुसार, महिलांना रात्रपाळीत काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यांच्या कामाच्या ठिकाणी पाळणाघराची व्यवस्था मालकाला करावी लागणार आहे. सणासुदीला खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यात जास्त वेळ कामगारांना काम करावे लागते त्यांना दुप्पट बोनस देणे बंधनकारक ठरणार आहे.

गेल्या वर्षी केंद्र सरकारने 29 कामगार कायदे रद्द केले आहेत. फक्त 4 कायद्यांमध्ये नवीन संहिता असणार आहे. ही कामगार संहिता तशीच राज्यांना लागू करता येणार नाही. या नवीन संहितेत काही सुधारणा करुन लागू केली जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!