मोठी बातमी! भारतातील सर्व विमानतळांवर 24 तास कडक सुरक्षा,काय आहे कारण?

पुणे : दहशतवादी हल्ल्याच्या धोक्याच्या इशाऱ्यानंतर भारतातील सर्व विमानातळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.4 ऑगस्ट रोजी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सुरक्षा शाखेने काही सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार भारतातील सर्व विमानतळावर 24 तास कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
याबाबत पुढे आलेल्या माहितीनुसार, येत्या 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान समाजविरोधी घटक किंवा दहशतवादी यांच्याकडून विमानतळावर संभाव्य धोका असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोकडून देण्यात आली आहे. यामुळेच आता विमानतळांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. विमानतळाच्या प्रत्येक गोष्टीवर सुरक्षा यंत्रणांचे बारीक लक्ष आहे. सर्व विमानतळावरील सर्व भागधारकांना विमानतळ, हवाई पट्टे, हवाई क्षेत्र हवाई दल स्थानके,हेलीपॅड यासारख्या सर्व नागरी विमान वाहतूक प्रदूषणावर सुरक्षा उपाययोजना वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सर्व सुरक्षा यंत्रणांना सूचना देण्यात आल्या की, 24 तास कडक सुरक्षा हवी आहे. काहीही झाले तरीही सुरक्षेत कोणत्याही प्रकारची हायगाई व्हायला नको. संवेदनशिल क्षेत्रामध्ये 24 तास गस्त घालण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.
त्यासोबतच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना देखील काही सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक विमानाची तपासणी आता कडक पद्धतीने केली जाणार आहे. सीसीटीव्ही प्रणाली पूर्णपणे कार्यरत असणार आहे. कर्मचाऱ्यांना देखील विमानतळ आवारात 24 तास आयकार्डशिवाय फिरता येणार नाही.काहीही संशयास्पद वाटले की, लगेचच कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.