मोठी बातमी! दहावीचा निकाल ‘या’ दिवशी लागणार


पुणे : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. नुकताच बारावीचा रिझल्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल आता जून महिन्यात लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 7 जून 2023 पर्यंत दहावी रिझल्ट लागणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्यापही महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून या बातमीला दुजोरा मिळालेला नाही.

यंदाच्या वर्षी बारावीचा रिझल्ट खूप लवकर लागला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा रिझल्ट ही लवकर लागला जाईल असा अंदाज बांधला जात आहे. यादरम्यान विद्यार्थी ही दहावीच्या बोर्डाच्या रिझल्टची आतुरतेने वाट पाहत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!