इंडिया आघाडीची मोठी खेळी!! उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार जाहीर, बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी…

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदासाठी सध्या देशात राजकीय घडामोडी घडत आहेत. याबाबत राजकारणात एक महत्त्वपूर्ण घडामोड आज पाहायला मिळत आहे. येत्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने आपले उमेदवार म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता यामुळे कमी झाली आहे. याबाबत काँग्रेसची एक बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर लगेचच मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवाराचे नाव जाहीर केले. यामुळे आता भाजपकडून संख्याबळ असताना देखील तयारी केली जात आहे.

या निवडणुकीत न्यायमूर्ती रेड्डी यांचा सामना सत्ताधारी एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्यासोबत होणार आहे. या उमेदवारीमुळे उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक आणखी रोमांचक होण्याची चिन्हे आहेत. बिनविरोध निवडणूक व्हावी, या भाजपच्या आवाहनला विरोधकांनी नकार दिला आहे. यामुळे निवडणूक होणार आहे.

काल रात्री बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावावर एकमत झाले. ही उमेदवारी केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून, ती विरोधी पक्षांची एक रणनीती असल्याचे दिसते. सध्या मोदी सरकार वोट चोरी प्रकरणामुळे अडचणीत आले आहे. यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बी. सुदर्शन रेड्डी यांनी कायद्याचे शिक्षण घेऊन बीए आणि एलएलबीची पदवी मिळवली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिले आहेत. त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले आहे. मोठा अनुभव त्यांना आहे.
