स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी मोठी खेळी ; पवारांचे आमदार शिंदे गटाच्या गळाला?


पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना राजकीय घडामोडींना चांगलाचं वेग आला आहे. या निवडणुकांसाठी आतासर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, या निवडणुकीआधीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन आमदार शिवसेना शिंदे गटाच्या गळाला लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सोलापूरमधील करमाळामध्ये शिवसेना शिंदे गटाची बैठक पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने संघटनबांधणीला वेग दिला आहे. या शिंदे गटाच्या बैठकीत पवार गटाच्या आमदाराची उपस्थिती दिसल्याने चर्चांना उधाण आले आहे.मोहोळमध्ये झालेल्या बैठकीत पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी सहभाग नोंदवला.त्यानंतर आमदार नारायण पाटील यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की, मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आमदार आहे. मात्र, तरी एकनाथ शिंदे हा कामाचा माणूस आहे. त्यामुळे मतदारसंघातील कामासाठी माझा एकनाथ शिंदे यांच्याशी नियमित संपर्क आहे असे आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना मागील काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात भूकंप घडणार असल्याची चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीतील काही आमदार महायुतीच्या संपर्कात असल्याचे दावे करण्यात येत आहेत. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकापूर्वी शरद पवार गटाला धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!